January 27, 2023
virat kohli dance

भारताचा स्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या काही काळापासून त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. तर, काही खेळाडूंनी सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. यादरम्यान, विराट कोहली मात्र, आपल्याच धुंदीत क्रिकेटचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातील त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कोहलीला त्याच्या बॅड पॅचबद्दल तीव्र टीकेला सामोरे जावे लागत असतानाही, तो मैदानावर आनंदी दिसतो. गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यादरम्यान त्याने लाँग-ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना चाहत्यांशी संवाद साधला होता. शिवाय, त्यांच्याच तालावर ठेकाही ठरला होता. आता पुन्हा त्याने अशीच कृती केली आहे. मँचेस्टरमधील अंतिम एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या सराव सत्रादरम्यान तो मजा करताना दिसला. त्याने कॅमेर्‍याकडे बघून नाचत-नाचत पाणी प्यायले. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना आवडत आहे.

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये २० धावांचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरला आहे. मागील सामन्यात, मजबूत सुरुवात करूनही कोहली १६ धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका सुरू आहे. या दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने विराट कोहलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. ती बघून अनुष्का शर्माला रहावले गेले नाही. तिने पीटरसनच्या पोस्टवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.