November 27, 2022
Saraswathi Rao

काही दिवसांपूर्वी ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमध्ये १०० मीटर स्प्रिंट(वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले होते. वृद्घापकाळामध्येही एखादी व्यक्ती इतका जबरदस्त खेळ कशी करू शकते? हा प्रश्न अनेकांना पडला होता. या दरम्यान, भारताच्या माजी टेबल टेनिसपटू सरस्वती राव यांचाही पाच वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताच्या माजी टेबल टेनिसपटू सरस्वती राव यांचा २०१७ मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या तरुण खेळाडूंसोबत खेळताना दिसत आहेत. साडी घातलेल्या सरस्वती राव इलेक्ट्रिक हँड आय आणि रॉकेट स्मॅश खेळताना दिसत आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्या भारताच्या दुसऱ्या सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जात होत्या.

व्हिडिओमध्ये ६९ वर्षांच्या राव आपल्या सर्व्हिसमुळे उपस्थितांना आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडत आहेत. त्यांनी उतारवयातदेखील आपले रिफ्लेक्सेस, खेळाचे तंत्र, फटक्यांची जागा आणि समन्वय तसूभरही कमी होऊ दिलेला नाही. आपल्या तरुणपणात सरस्वती राव आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकापर्यंत पोहचल्या होत्या. याशिवाय त्या कर्नाटक स्टेट चॅम्पियन देखील होत्या.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.