
सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काहींचा हेतू हा मनोरंजन करणे हा असतो, तर काही लोकांना सावध करण्यासाठी शेअर केल्या जातात. यातील सर्वात जास्त व्हायरल होतात ते हटके कल्पना वापरून केलेले जुगाड. असेच इंटरनेटवर सर्वात जास्त लोकप्रिय आणि व्हायरल होणारे जुगाड ट्विटरवर काही युजर्सनी शेअर केले आहेत. हे ट्वीट्स पाहून तुम्हीसुद्धा अचंबित व्हाल, पाहा व्हायरल होणारे हे ट्वीट्स.
व्हायरल ट्वीट्स :
१) या ट्वीटमध्ये ऑनलाईन मिटिंगमध्ये सहभागी होण्याचा कंटाळा आल्याने, या महिलेने चक्क स्वतःच्या जागी पुतळा ठेऊन झोपून घेतल्याचे दिसत आहे.
२) मोठ्यांसह लहान मुलंही जुगाड करण्यात काही कमी नाहीत. या पोस्टमध्ये ही लहान मुलं मोठ्यांच्या कल्पनाशक्तीला टक्कर देत असल्याचे दिसत आहे. कोणी सावली वरून चित्र काढत आहे; तर कोणी काचेच्या टेबलावर टॅब ठेऊन, त्या खाली झोपून व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेत आहे.
Viral Video : कुत्र्याला फ्रिज कसा उघडायचा ते शिकवले अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच
३) या मुलाने तर कोणत्याही कार्यक्रमात जेवताना बसायला खुर्ची न मिळण्यावर तोडगा काढलेला दिसत आहे. हा मुलगा चक्क भिंतींच्या विटांमध्ये प्लेट अडकवून आरामात जेवण करताना दिसत आहे.
४) यामध्ये वेगवेगळ्या भन्नाट कल्पना वापरून रोजच्या गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
नेटकऱ्यांना हे व्हायरल जुगाड आवडले असून या ट्वीट्सवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.