November 27, 2022
Girls Fighting-Video-Viral

Uttarakhand Girls Fighting For Boyfriend : आतापर्यंत मुलींसाठी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. चक्क एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुलींचा गट आपापसात भिडल्याचं पहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना लाठीने सुद्धा मारहाण केली आहे. या भांडणात मुली इतक्या आक्रमक होतात की एकमेकींच्या पार झिंज्या उपटून जमिनीवर आपटून फ्री स्टाईल मारहाण केलीय. हे वाचून तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण हे दृश्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत.

एक बॉयफ्रेंडसाठी मुलींमध्ये झालेल्या या भयंकर भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हा वाद साऱ्यांचाच औत्सुक्याचा विषय बनलाय. हा व्हिडीओ उत्तराखंडमधल्या हलद्वानी शहरातला आहे. आधी मुलींवरुन मुलांची भांडण व्हायची, मात्र आता जमाना बदलाय आता मुली मुलांवरुन भांडण करायला लागल्या आहेत. यातील मुली चक्क एकमेकींचे केस ओढून मारमारी करत आहेत. तर, काही मुलींच्या हातात काठी आहे, ज्याने त्या इतर मुलींना मारत आहेत. मुलींमधली ही जबरदस्त फायटिंग तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल. काही महिला यात भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात. पण आक्रमक झालेल्या मुली ऐकायचं काही नाव घेत नव्हत्या. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की दोघींमध्ये काहीतरी युद्ध सुरू झालंय आणि जी या फायटिंगमध्ये जिंकेल, बॉयफ्रेंड तिचा होईल.

आणखी वाचा : सांगा पाहू या PHOTO मध्ये कुत्रा कुठे लपला आहे? शोधा म्हणजे नक्की सापडेल!

मुलींची ही फ्री स्टाईल हाणामारी पाहून आजुबाजूने जाणाऱ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलींची ही हाणामारी अनेकांनी मोबाइलमध्ये टिपली. यानंतर मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते सुद्धा हैराण झाले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींनी एका मुलासाठी हे भांडण केलं होतं. ही सर्व हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेच पोलीस त्यांचा पुढील तपास करत आहेत. मात्र, दोन्ही बाजूंपैकी कोणीही अद्याप पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचलेले नाही.

आणखी वाचा : २० हजार किलो बटाटा चिप्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डोळ्यादेखत हवेत उडू लागली मुलगी, पाहून आई घाबरून गेली; पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलींना काही काम नाहीये का? सगळ्या मुली गल्ली बॉय चित्रपटातील आलिया भट्ट झाल्या आहेत, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.