December 5, 2022
Robber-Funny-Video-Viral

सोशल मीडियाचं जग मजेदार व्हिडीओंनी भरलंय. कधी काय व्हायरल होईल, हे कोणी सांगू शकत नाही. सध्या एका चोराचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा चोर चोरी करण्यासाठी एका बेकरीच्या दुकानात घुसतो खरा…सोबत हातात चाकूही घेऊन येतो, पण दुकानात असलेल्या एका महिलेने त्याला कपड्याने मारत मारत पळवून लावलं, हे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. चाकू घेऊन आलेला चोर कपड्याने मार खाऊन जातो, हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण हे प्रत्यक्षात घडलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला बेकरीमध्ये साफसफाई करत असताना अचानक एक चोरटा काळ्या रंगाचे कपडे परिधान करत बेकरीतल्या गल्ल्यातले पैसे चोरण्यासाठी घुसतो. लतीफ पेकर नावाची ही महिला तिच्या मुलाच्या बेकरीच्या काउंटरच्या मागे होती. आपल्या बेकरीमध्ये घुसलेला चोर पाहून सुरूवातीला ही लतीफ पेकर घाबरून जाते. पण आपल्या मुलाच्या बेकरीच्या गल्ल्यातले पैसे हा चोरटा घेऊन जातोय, हे पाहून या महिलेला मात्र रहावलं नाही. यावेळी तिच्या हातात जो कपडा होता, त्या कपड्यानेच ती या चोरट्यासोबत लढू लागली. विशेष म्हणजे या चोरट्याच्या हातात चाकू होता, पण महिला त्या चोरट्याच्या चाकूलाही घाबरली नाही आणि अगदी निडरपणे केवळ कपड्याच्या मदतीने ती चोरट्याशी लढू लागली. पैसे चोरण्यापासून रोखण्यासाठी ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. यात हा चोरटा तिला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याही वरचढ ही महिला ठरते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

या व्हिडीओमध्ये पुढे जे घडतं ते खूपच मनोरंजक आणि हसू येणारं आहे. जसा हा चोरटा महिलेला पकडण्याचा प्रयत्न करतो, तितक्यात संधी साधत ही महिला कपड्यानेच चोराला आवळून पकडून ठेवते. यावेळी चोर या महिलेच्या तावडीतून सुटण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करतो. पण या महिलेने त्याला इतकं घट्ट पकडून ठेवलं की त्याला तेथून सुटताच येत नव्हते. बेकरीतला आवाज ऐकून एक माणूस तिथे येतो आणि ते पाहून हा चोर संधी साधून पळून जातो. व्हिडीओ पाहून तुम्ही सुरूवातीला हैराण तर व्हालच पण महिलेने ज्या पद्धतीने चोराला पळवून लावलंय, ते पाहून मात्र तुम्हाला हसू आवरता येणार नाही. तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल, पण सोबत चाकू घेऊन आलेला हा चोर महिलेच्या कपड्याने मार खाऊन अखेर घाबरून त्याने धूम ठोकली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : निर्दयी आईने एक वर्षाच्या चिमुकलीला चपलीने बेदम मारहाण केली, मग शेतात दिलं फेकून

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नंदीवर स्वार होऊन रस्त्यावर अवतरले ‘महादेव’! अनोख्या भक्ताचा VIRAL VIDEO पाहाच…

ही घटना नेदरलॅंडमधल्या मेवलाना बेकरीमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो लेखिका तानसू येगेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना विश्वास करणं अवघड होऊ लागलंय. तसंच अनेक युजर्सनी तर महिलेच्या हातात काही नसताना ज्या पद्धतीने चोराशी सामना केला आहे, त्याबाबत तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येतंय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने लिहिलं की, “तुम्ही डॉनी येनचा इपमॅन पाहिला असेल तर त्यात तो शस्त्रासाठी पंख्याचे डस्टर वापरतो. या महिलेने तर कमालच केली आहे. सलाम!” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, “ओएमजी तिने मला माझ्या आजीची आठवण करून दिली,”.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.