November 27, 2022
sheep attack a girl

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप गोड असतात, तर काही व्हिडीओ खूपच भयानक असतात. हे व्हिडीओ पाहून आपण घाबरतो. प्रत्येक प्राण्याचा एक विशिष्ट स्वभाव असतो. त्यानुसार ते वागत असतात. पण त्यांना त्रास दिला तर ते चांगलीच अद्दल घडवतात. असाच एक मजेशीर मात्र तितकाच गंभीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही प्राणी अतिशय सौम्य दिसतात तर काही अतिशय धोकादायक असतात. तुम्ही कोणत्याही शांत प्राण्याला कारण नसताना छेडले तर तो त्याचे उग्र रूप दाखवतो. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्येही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी शेजारच्या मेंढ्याकडे जाते आणि त्याची छेड काढू लागते. मेंढ्याला मुलीचे असे वागणे अजिबात आवडत नाही आणि तो तिच्यावर हल्ला करतो.

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

ही मुलगी त्या मेढ्याला मारण्यासाठी हातवारे करते. याचा त्या मेंढ्याला राग येतो आणि तो तिच्यावर हल्ला करतो. एकप्रकारे या मेंढ्याने मुलीला चांगलाच धडा शिकवला. व्हिडीओच्या शेवटी आपण पाहू शकतो की मेंढ्यापासून मुलीला वाचवण्यासाठी एका व्यक्तीला तिथे यावे लागले. हा व्हिडीओ ब्युटी वाइल्ड लाइफ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.