February 3, 2023
India's star batsman Virat Kohli has started a big luxury restaurant in the house of famous singer Kishore Kumar in Mumbai

भारतीय क्रिकेटपटू हे क्रिकेट व्यतिरिक्त बरेच काही करताना दिसत आहेत. याआधीही माजी खेळाडू युवराज सिंगने Airbnbचे यजमानपद घेत गोव्यातील त्याचा बंगला सहा जणांच्या ग्रुपसाठी मुक्कामाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय खेळाडू हे मैदानाच्या बाहेर एक व्यावसायिक म्हणून झळकत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा किशोर कुमारांचा खूप मोठा चाहता आहे. यामुळेच आता त्याने किशोर कुमार यांचा मुंबईच्या जुहू येथील बंगला भाड्याने घेतला आहे. विराटने पाच वर्षांसाठी हा बंगला भाड्याने घेतला असून, यात त्याने एक उच्च दर्जाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जुहूमधील बंगल्यात एखादं रेस्टॉरंट सुरु करण्याची त्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्याने ती आज पूर्ण केली. तो क्रिकेटमधील एक पोस्टर बॉय असून त्याने केलेली प्रत्येक कृती ही एक चर्चेचा विषय ठरते. विराटने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. या व्हिडिओत विराटसह अभिनेता मनीष पॉल हा देखील दिसत आहे.

किशोर कुमार यांच्या या जुन्या बंगल्याचे नाव ‘गौरी कुंज’ असे होते. आता हे ‘वन8 कम्युन’ या नावाने ओळखले जाणार आहे. विराट कोहली याने मागील महिन्यात हा बंगला पाच वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतला होता. आता हा बंगला काही दिवसांमध्येच रेस्टॉरंटमध्ये बदलल्याचे दिसत आहे. इंस्टाग्रामवरील व्हिडिओत त्याने गौरी कुंजमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्यामागची कल्पना कशी सुचली याबाबत सांगितले. विराट कोहली म्हणतो की, “हा स्वर्गवासी किशोर कुमार यांचा बंगला आहे. हा बंगला आमच्या संकल्पनेशी अगदी जुळून गेला.”

हेही वाचा :  जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांचे आव्हान संपुष्टात, मनिका बत्राचा सूर हरवलेलाच 

विराट कोहलीने जुहूच्या या रेस्टॉरंट बाबत आपल्या यूट्यूब व्हिडिओत माहिती दिली आहे. या व्हिडिओत मनिष पॉल गेस्ट म्हणून रेस्टॉरंटमध्ये येतो. त्याच्या ‘वन8 कम्युन’ या नवीन रेस्टॉरंटची झलक दाखवली असून त्यात काही किशोरदा यांची गाणी देखील गुणगुणली आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.