February 2, 2023
Virat Kohli Shares His Bad Experience in Paris Says It was Nightmare for Vegetarians

Virat Kohli Shares Bad Experience: भारतीय क्रिकेटरसिकांना खेळाइतकाच इंटरेस्ट हा आपल्या आवडत्या खेळाडूंच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यातही असतो. विराट कोहलीच्या बाबत तर अनेकजण गूगलवर सुद्धा कित्येक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात.अलीकडेच विराट कोहलीने स्वतः आपल्या चाहत्यांच्या काही प्रश्नांना स्वतः उत्तर दिले आहे. टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या आधी कोहलीने One 8 Commune युट्युब चॅनेलवर आपल्या सर्वात वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे.

विराट कोहली हा स्वतः विविध पदार्थांचा प्रेमी असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे, त्याच्या इंस्टाग्राम व सोशल मीडिया पेजवरही याचे अनेक पुरावे दिसतीलच. आता कोहलीने आपल्या एका सहखेळाडुच्या खाण्याच्या सवयींविषयी भाष्य केले आहे. ऋद्धिमान साहाला मी जेवणाचे विचित्र कॉम्बिनेशन खाताना पहिले आहे. एकदा तर तो बटर चिकन, रोटी व सॅलड खात होता त्याचे काही घास खाऊन झाल्यावर त्याने अख्खा रसगुल्ला खाल्ला. ऋद्धिमानला असे विचित्र प्रयोग करायची सवय आहे, याआधी तो वरण भात व खातानाही मध्येच आईस्क्रीम खायचा, असेही विराटने सांगितले आहे.

याच मुलाखतीत विराटने आपल्या पॅरिस ट्रिपविषयी भाष्य केले. अलीकडेच पॅरीसमध्ये असताना खाण्यापिण्याची सोय उत्तम नव्हती, शाकाहारी असल्याने एक वाईट स्वप्न होते. तिथे कोणाला काय हवंय हे सांगताही येत नव्हतं आणि खाण्यासाठी काही अन्य पर्यायही मिळत नव्हता असे म्हणताना विराटने हा आपल्या ट्रीपमधील सर्वात वाईट अनुभव असल्याचे सांगितले आहे.

IND vs SA: मला बरं नाही.. भूक लागली म्हणत ‘तो’ विराट कोहलीकडे गेला, एका सेल्फीसाठी मोजले २३,०००

दुसरीकडे, विराट कोहलीने आपल्या भूतानमधील अनुभवाविषयीही चांगल्या आठवणी सांगितले. भूतानमध्ये ऑरगॅनिक भाज्या व वाईल्ड राईस खाण्याची पद्धत आहे. इथे असणारे भूतानी फार्महाऊस म्हणजेच छोट्या झोपड्या ज्यात जिना चढून वर राहण्यासाठी सोय असते तर झोपडीखाली भाज्या उगवल्या जातात हि पद्धत विराटला फार आवडल्याचे त्याने सांगितले. अशाच एका ठिकाणी जेवण केल्याचा अनुभव विराटने या मुलाखतीत सांगितला होता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.