December 5, 2022
Audio notes can now be kept as status on Whatsapp

व्हॉट्सॲप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. आज देशातील जवळपास प्रत्येक घरात व्हॉट्सॲप वापरतात, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. भारतातील जवळपास सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये व्हॉट्सॲप देखील आहे. व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांना वेळोवेळी नवीन आणि उपयुक्त अपडेट्स देत राहण्याची पूर्ण काळजी घेते. यावेळी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर आणले आहे, ज्याबद्दल ऐकून वापरकर्त्यांना आनंद झाला आहे.

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये यूजर्स आधी व्हॉट्सॲपवर फक्त फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू शकत होते. मात्र, आता या नवीन फीचर्समुळे यूजर्सना ऑडिओ नोट्स देखील शेअर करता येईल. होय, व्हॉट्सॲपने आणलेल्या नवीन फीचर्समुळे यूजर्स आता फोटो आणि व्हिडीओ सोबत ऑडिओ नोट्स देखील शेअर करू शकतात.

( हे ही वाचा: १ कोटी ९० लाखांहून अधिक व्हॉट्सॲप अकाऊंट ब्लॉक! जाणून घ्या काय आहे कारण)

व्हॉट्सॲप स्टेटसवर ऑडिओ नोट्स टाकता येतील

आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे, नवीन अपडेटनंतर, जेव्हाही तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस सेट कराल, तेव्हा तुम्ही त्यावर फोटो आणि व्हिडिओंव्यतिरिक्त व्हॉट्सॲपव्हॉइस नोट्स वापरण्यास सक्षम असाल. स्टेटसवर शेअर केलेल्या व्हॉईस नोटला ‘व्हॉइस स्टेटस’ म्हटले जाऊ शकते. या नवीन अपडेटमुळे वापरकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

हे नवीन अपडेट कसे कार्य करेल

WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये हे नवीन फीचर्स कसे कार्य करेल हे स्क्रीनशॉट्सद्वारे तपशीलवार सांगितले आहे. स्क्रीनशॉटनुसार, स्टेटस टॅबच्या तळाशी एक नवीन पर्याय किंवा आयकॉन असेल, ज्यामुळे यूजर स्टेटस अपडेट्सवर व्हॉइस नोट्स वापरण्यास सक्षम असेल. तुम्ही ज्याला तुमचा स्टेट्स दाखवण्याची परवानगी द्याल तो हा ‘व्हॉइस स्टेटस’ ऐकू शकेल. लक्षात ठेवा, हे व्हॉइस स्टेटस व्हॉट्सॲप एंड टू एंड एन्क्रिप्शन अंतर्गत देखील येईल. सध्या या फीचरवर काम केले जात आहे आणि ते किती काळ आणि कोणत्या डिव्‍हाइसेससाठी रिलीज केले जाईल याबद्दल कोणतीही माहिती आलेली नाही.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.