January 27, 2023
WhatsApp Hack : तुमचं व्हॉटसअ‍ॅप अकाउंट दुसर कोणी वापरतय का? ‘ही’ ट्रिक वापरुन लगेच ओळखा

सायबर हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, अशात स्मार्टफोनमधील वेगवेगळे अ‍ॅप्स हॅक होऊ शकतात. यामुळे सुरक्षेसाठी प्रत्येक अ‍ॅपबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे. त्यातच काही महत्त्वाच्या ॲप्सवर वैयक्तिक डेटा असतो, जो हॅकर्सकडुन चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला कोणतेही अ‍ॅप हॅक झाले अशी शंका असेल तर तुम्ही लगेच त्यावर एक्शन घेत डिसकंटिन्यु किंवा लॉगआऊट करून अनइन्स्टॉल करू शकता. अशावेळी तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट दुसरं कोणी वापरतय का हे जाणून घेण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरू शकता.

व्हॉटसअ‍ॅपचे अकाउंट दुसरं कोणी वापरतय का हे जाणून घेण्यासाठी वापरा या टिप्स

  • व्हॉटसअ‍ॅप सेटींग्समध्ये जाऊन लिंकड डिवाईस या पर्यायावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला एक लिस्ट दिसेल ज्यामधून तुमचे अकाउंट किती ठिकाणी लॉग इन आहे हे स्पष्ट होईल.
  • जर इथे अनोळखी डिव्हाईस दिसत असेल तर याचा अर्थ कोणीतरी तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट वापरत आहे.
  • इथे त्या डिवाईसवर क्लिक करून त्यामधून लॉग आऊट करू शकता.

अशाप्रकारे या स्टेप्स वापरुन अनोळखी डिव्हाइसमधून लगेच लॉग आऊट करून तुम्ही व्हॉटसअ‍ॅप हॅक होण्यापासून वाचवु शकता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.