February 2, 2023
World Athletics Championships: नीरज चोप्राची 'रुपेरी' कामगिरी, ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक | Neeraj Chopra Wins Silver at World Athletics Championships sgy 87

भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.

Viral Video : नीरज चोप्राच्या एका कृतीने पुन्हा जिंकली देशवासीयांची मने; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राने ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदक आपल्या नावे केलं. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

दरम्यान ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान मिळवलं. पहिल्या प्रयत्नात त्याने ९०.२१ मीटर आणि त्यानंतर ९०.४६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.