January 28, 2023
Magnus Carlsen

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील पाच वेळाचा विजेता मॅग्नस कार्लसनने धक्कादायक खुलासा केला आहे. पुढील वर्षी (२०२३) होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत तो सहभागी होणार नाही. त्यामुळे तो रशियाच्या इयान नेपोम्नियाच्ची (Ian Nepomniachtchi) विरुद्ध खेळून आपल्या गतविजेतेपदाचे रक्षण करताना दिसणार नाही. ‘मॅग्नस इफेक्ट’ पॉडकास्टच्या पहिल्या भागात बोलताना त्याने याबाबत माहिती दिली.

तो म्हणाला, “मला असे वाटते की मला आता काही मिळवायचे नाही. याबाबत मी माझ्या टीमशी, जागतिक बुद्धिबळ महासंघ आणि इयानशी चर्चा केली आहे. जागतिक बुद्धबळ स्पर्धेत मी सामना खेळणार नाही.” कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतली असली तरी इतक्यात निवृत्तीचा विचार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. “सामना खेळण्याची माझी इच्छा नाही. ऐतिहासिक कारणांमुळे हा सामना सर्वांसाठी मनोरंजक असेल. तरी देखील मला खेळावेसे वाटत नाही,” असेही कार्लसन म्हणाला.

३१ वर्षीय कार्लसनने डिसेंबर २०२१ मध्ये दुबईमध्ये नेपोम्नियाच्ची विरुद्ध ७.५-३.५ असा विजय मिळवून पाचव्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. दरम्यान, नेपोम्नियाच्चीने माद्रिदमधील ‘कँडिडेट्स टूर्नामेंट’ जिंकून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवली. त्यामुळे २०२३मध्ये दोघांचा सामना होणार होता. मात्र, कार्लसनने माघार घेतली आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.