February 2, 2023
xiomi 12 t pro

भारतात गुणवत्तापूर्ण कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि गतिमान प्रोसेसर असलेले फोन देण्याची जणू शर्यतच लागलीये की काय, असे सध्याचे चित्र पाहून वाटत आहे. सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांनी १०० मेगापिक्सेलसह आपले ५ जी फोन्स लाँच केले आहेत. याच फीचरमध्ये आणखी भर घालण्याची कमाल शाओमीने केली आहे. कंपनीने XIAOMI 12 T आणि XIAOMI 12 T PRO हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यातील XIAOMI 12 T pro मध्ये गुणवत्तापूर्ण आणि सुंदर छायाचित्र काढण्यासाठी २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

XIAOMI 12 T फोनमध्ये काय आहे खास?

शाओमी १२ टीवर काम करताना तो अडखळू नये यासाठी त्यात टीएसएमसी ५ एनएमवर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी ८१०० अल्ट्रा चिपसेट देण्यात आले आहे. चांगले वाचन होण्याच्या दृष्टीकोणातून आणि व्हिडिओ स्पष्ट दिसण्याकरिता फोनमध्ये ६.६७ इंचची १२० हर्ट्झ एचडीआर १० प्लस क्रिस्टलरे अमोलेड स्क्रिन देण्यात आली आहे. फोनमध्ये अडाप्टिव्ह सिंक आणि अडाप्टिव्ह रिडिंग असे फीचर देण्यात आले आहे.

(सुवर्ण संधी! फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये iphone 13 वर ९ हजार ९१० रुपयांची सूट, ‘हे’ केल्यास आणखी होईल बचत)

फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील प्रमुख कॅमेरा हा १०८ मेगापिक्सेलचा आहे. तसेच ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर व्हिडिओ, फोटोग्राफी दीर्घकाळ करण्यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, १२० वॉट फास्ट चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.

XIAOMI 12 T PRO चे दमदार फीचर

शाओमी १२ टी प्रोमध्ये उत्तम छायाचित्र निघण्यासाठी २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड लेन्ससह २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्याद्वारे तुम्ही फुल रेझोल्युशनमध्ये ८ के व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकता. फोनमध्ये गतिमान कार्यासाठी स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिप्सेट देण्यात आले आहे. तसेच स्पष्ट चित्र दिसावे यासाठी ६.६७ इंच १२० हर्ट्झ एचडीआर १० प्लस क्रिस्टलरे अमोलेड स्क्रिन देण्यात आली आहे.

(‘या’ सेलमध्ये कमी किंमतीत iphone 14 घेण्याची संधी, जाणून घ्या ऑफर)

फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोनची किंमत

हे दोन्ही फोन्स १३ ऑक्टोबरपासून युरोपमधील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. १२ टीची किंमत ४८ हजार रुपये असणार आहे, तर १२ टी प्रो ची किंमत ६० हजार रुपये असणार आहे. यूकेमध्ये हा फोन २० ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. येथे १२ टी ची किंमत ४६ हजार रुपयांपासून सुरू होणार आहे, तर १२ टी प्रोची किंमत ६४ हजार रुपये असणार आहे.

विशेष म्हणजे, तातडीने विक्री व्हावी यासाठी कंपनी फोनची किंमत कमी ठेवणार आहे. २० ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान कंपनी ३७ हजार आणि ५५ हजार रुपयांमध्ये या फोनची विक्री करणार आहे. दरम्यान भारतीय ग्राहकांसाठी हे फोन कधी उपलब्ध होतील याबाबत शाओमीने स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र भारतात स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. प्रचंड मागणी बघता लवकरच हे फोन देशात मिळण्याची शक्यता आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.