November 27, 2022
full form of Google

आपल्या दैनंदिन वापरात आपण अनेक शब्दांचे शॉर्टफॉर्म्स म्हणजेच त्यांचे संक्षिप्त रूप वापरतो. काही संक्षिप्त रूपांचे अर्थ आपल्याला माहित असतात. मात्र काही शब्दांचे अर्थ माहीत नसल्याने आपल्याला ते संक्षिप्त रूपच मूळ शब्द वाटतात. असेच काही शब्द म्हणजे यूएसबी, व्हायरस, एलसीडी इत्यादी. हे शब्द आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्रास वापरत असलो तरीही या संक्षिप्त शब्दांचे पूर्ण रूप तुम्हाला कदाचित माहित नसेल.

जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक दुकानात टीव्ही घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे टीव्ही दाखवले जातात, त्यापैकी एलसीडी देखील आहे. परंतु तुम्हाला त्याचे पूर्ण रूप नक्कीच माहित नसेल. एलसीडीचे पूर्ण रूप लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (Liquid Crystal Display) आहे.

डेस्कटॉप असो किंवा लॅपटॉप, कोणतेही इनपुट मदरबोर्डशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला इनपुट डिव्हाइस आवश्यक आहे. माऊस, कीबोर्ड सारखी इनपुट टूल्स यूएसबीद्वारे जोडली जातात. यूएसबीचे पूर्ण रूप युनिव्हर्सल सीरियल बस (Universal serial Bus) आहे.

तुम्हालाही आहे सकाळी उठल्यावर फोन बघण्याची सवय? मग ‘हे’ तोटे वाचाच

मोबाईल, लॅपटॉपमध्ये व्हायरस असू शकतो असे आपण अनेकदा ऐकले आहे. इतकेच नाही तर आपण आपल्या सामान्य जीवनात अनेक प्रकारच्या व्हायरस असलेल्या म्हणजेच विषाणूजन्य आजारांबद्दल ऐकले आहे, परंतु त्याच्या पूर्ण स्वरूपाबद्दल आपल्याला माहिती नाही. व्हायरस (VIRUS) चे पूर्ण रूप म्हणजे वायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेज अंडर सीज (Vital Information Resources Under Siege) असे आहे.

काही कंपन्यांची अशी नावे आहेत, जी फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये ओळखली जातात परंतु त्याचे पूर्ण स्वरूप कोणालाच माहित नाही. आपण दररोज आपल्या स्मार्टफोनवर गुगल (Google) वापरतो. जसे की आपणा सर्वांना माहित आहे की गुगल हे एक सर्च इंजिन आहे ज्यावर आपण कोणत्याही प्रकारचे प्रश्न सर्च बारमध्ये टाइप करून त्यांची उत्तरे शोधू शकतो. जर तुम्ही वाटत असेल की गुगलचे पूर्ण स्वरूप नाही तर तुम्ही चुकीचे आहात. खूप कमी लोकांना माहित आहे की गुगलचे एक पूर्ण रूप देखील आहे, कारण सुरुवातीपासून लोकांनी फक्त गुगल हे नाव ऐकले आहे. आज आपण गुगलचे पूर्ण नाव जाणून घेऊया.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

सुरुवातीला गुगलचे नाव बॅकरब (BackRub) होते. गणिताचा अभ्यास करणार्‍या लोकांना माहित असेलच की शंभर शून्य असलेल्या एकाला गुगल म्हणतात. यावरूनच गुगलला हे नाव देण्यात आले. गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून प्रत्येकाला अगणित माहिती मिळावी, अशी यामागची संकल्पना होती. आता गुगलचे पूर्ण रूप जाणून घेऊया. गुगलचे पूर्ण रूप म्हणजे ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ (Global Organisation of Oriented Group Language of Earth) असे आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.